बोराळा येथील अवैध दारूविक्री विरोधात नारीशक्ती एल्गार

संतप्त महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिले मागणीचे निवेदन

0

हिंगोली, रयतसाक्षी : तालुक्यातील बोराळा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, या मागणीसाठी हिंगोली येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.२७) संतप्त महिलांनी अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांना निवेदन दिले.

बारोळा येथील तिघेजन मागील अनेक वर्षापासून अवैधरित्या दारू विक्री करीत आहेत. प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचार्यांनी या मुकसंमतीने सुरू असलेल्या अवैध्य दारू विक्रीमुळे गावात व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे.

मोकाट मद्यपींचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बोराळा येथील अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी महिला मंडळाने पोलीस प्रशासनाकडे आज केली. बोराळा येथील ग्रामस्थ, महिलांनी यापूर्वीही पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदनाद्वारे अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली होती.


मात्र, मागणीला बगल देत अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याचा यावेळी संतप्त महिलांनी यावेळी व्यक्त केला . पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनावर तंटामुक्ती अध्यक्षांसह गावचे सरपंच, उपसरपंच गावातील नागरिक तसेच मोठ्या संख्येने महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.