प्रजासत्ताकदिनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीणचे रक्तदान‌ शिबीर

जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांच्या आवाहनाला युवकांची साद ; १०६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

नांदेड, रयतसाक्षी: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 26 जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात मौजे रहाटी (ता.जि. नांदेड) येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली युवक पदाधिकारी ओंकार बोकारे यांनी रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

कोरोणा कालावधीत सामाजीक बांधीलकी जोपासण्यासाठी नांदेड ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतिने रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, दंत चिकित्सा शिबीर घेऊन मानवतेचा संदेश दिला आहे . दरम्यान , रक्तदान शिबिरात 106 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ग्रामस्थ, नागरिकांनी मोठ्या संख्येने मोफत नेत्र तपासणी शिबिर व दंत चिकित्सा शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम हे होते, तर उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण व पूजन आणि अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी उपस्थित असलेल्या युवकांना व ग्रामस्थांना व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भगवानराव पाटील आलेगावकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मोहम्मद खान पठाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे उद्घाटक हरिहरराव भोसीकर आणि शहर जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी मनोगत व्यक्त केले .

यावेळी माजी सरपंच पंढरीनाथ बोकारे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर पाटील बोकारे, उपाध्यक्ष तातेराव आलेगावकर, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष मधुकरराव पिंपळगावकर, जिल्हा सरचिटणीस प्रा.जांभरूनकर, गणेश तादलापूरकर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष गंगाधर पाटील कवाळे, उत्तर विधानसभा अध्यक्ष गजानन वाघ आदी प्रमुख नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी केले व आभार ओंकार बोकारे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.