प्रजासत्ताकदिनी निसर्ग स्वच्छतादूताचे निसर्गार्पण

जागतिक पातळीवर अतिसंकटग्रस्त म्हणून नोंद असलेल्या हिमालयीन ग्रीफ्रॉन व्हलचरची बीड जिल्ह्यात प्रथमच नोंद

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: जागतिक स्तरावर संकटग्रस्त म्हणून नोंद असलेले निसर्ग स्वच्छतादूत हिमालयीन ग्रिफॉन व्हल्चर सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रातीतील दोन वर्षाच्या उपचारानंतर काल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयएफएस अमोल सातपुते यांच्या हस्ते निसर्गार्पण करण्यात आले.

यावेळी अशोक काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी, सुभाष साळवे, कृषी विकास अधिकारी,शिवप्रसाद जटाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. विजयकुमार देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,सयाप्पा गरांडे,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,भुजंगराव खेडकर,कृषी अधिकरी, प्रकाश उजगरे, अध्यक्ष विद्यार्थी रिपब्लिकन सेना , सर्पराज्ञी चे संचालक सिद्धार्थ सृष्टी सोनवणे उपस्थित होते.

दोनवर्षांपूर्वी खामगाव जिल्हा बीड येथे घायाळ अवस्थेत आढळून आले होते.त्यास वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी उपचारासाठी सर्पराज्ञीत दाखल केले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांच्या उपचार व सेवा शुश्रूषेनंतर पूर्णपणे बरे झालेले हिमालयीन ग्रिफॉन गिधाड काल दिनांक २६जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी आयएफएस अमोल सातपुते यांच्या हस्ते त्यात निसर्गात सोडून देण्यात आले.

बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच नोंद
जगभरामध्ये गिधाडांच्या २३ प्रजाती आढळून येतात. भारतात नऊ प्रजाती आढळतात.यामध्ये अत्यंत संकटग्रस्त समजले जाणारे हिमालयीन ग्रीफ्रॉन व्हलचर अत्यंत दुर्मिळ आणि संकटग्रस्त असणारी प्रजात आहे.या प्रजातीची नोंद बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच झालेली आहे.

” निसर्ग चक्रातील एक महत्त्वाचा दुवा असणारे निसर्ग स्वच्छतादूत म्हणून ओळख असलेले गिधाड सृष्टीतून दिवसेंदिवस लोप पावत चाललेली आहे. त्यांना नामशेष होण्यापासून वाचवणं हे पूर्णपणे आपली जबाबदारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.