विना परवाना‌ शस्र बाळगणा-यावर कारवाई

पुसेगाव परिसरातील घटना; नरसी नामदेव पोलीसात गुन्हा , आरोपीकडून तलवार जप्त

0

हिंगोली, रयतसाक्षी: पुसेगाव (ता. हिंगोली) शिवारात विनापरवाना बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी शनिवारी (दि.२९)एकावर कारवाई करण्यात आली आहे. नरसी नामदेव पोलीसांना आरोपीकडून तलवार जप्त केली आहे .

नरसी नामदेव पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार शनिवारी (दि.२९) पुसेगाव शिवारात शहारुख खान उर्फ‌ गुफरान इशांत खान पठाण हा विना‌परवाना बेकायदेशीररित्या २० इंच लांब लोखंडी तलवार बाळगिताना आढळून आला . यावेळी पोलिसांनी कारवाई करून शाहरुख खान उर्फ गुफरान इनायत खान पठाण याच्या जवळील वीस इंच लांबीची एक लोखंडी तलवार जप्त केली.

बोराळा येथील अवैध दारूविक्री विरोधात नारीशक्ती एल्गार https://rayatsakshi.com/1542/ 

पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख खान उर्फ गुफरान इनायत खान पठाण याच्याविरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडील लोखंडी तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.