शिरूरच्या नगराध्यक्षपदाचा बहूमान ‘प्रतिभा’ वंतांनाच

आमदार धस सभेतील अश्वासन पाळणार!, रोहिदास पाटलांच्या एकिनष्ठतेचे फलित

0

रयतसाक्षी:  शिरूर कासार नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी सुटल्याने हौशांना अध्यक्षपदाचे स्वप्न पडू लागले आहेत.सोशल मीडीयाच्या फेसबुक पोष्ट तर ट्टीटरवर टिव् टिवाट सरू झाला आहे दरम्यान शिरूरच्या राजकिय पटलावरील जानत व्यक्तीमहत्व म्हणून सर्वत्र परिचीत  प्रथमनगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर यांच्या शिवाय शहराच्या राजकारणचा अध्याय सुरू होवू शकत नाही हे पक्षश्रेष्ठींनी वारंवार सभेतून जाहिर केले यास शहरवासी साक्षी आहेत .

 

ग्रामपंचायतीसह नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून मधल्या काळातील काही वर्षे सोडले तर नगराध्यपद रोहिदास पाटील यांच्याकडे कायम असल्याचे शहरवासीयांनी अनुभवल आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरील निष्ठा कायम ठेवत रोहिदास पाटील यांना पक्षांतर्गत कुरघोड्या करणऱ्यां विघ्नसंतोषींचा इमाने इतबारे सामना करावा लागला.

 

गावगाड्यापासून शहराचा कारभार हाकण्याच्या दांडगा अनुभवच त्याची जमेची बाजू आहे. म्हणूनच  नागिरकांच्या मुलभुत समस्यांची जान ठेवणारं व्यक्तीमहत्व म्हटलं की शहरासोबत रोहिदास पाटील यांच नांव जोडलं जात. लोककल्याणासाठी पदाचा वापर करण्याचा मुलमंत्र रोहिदास पाटील यांनी तालमीतल्या कित्तेकांना दिला आहे .पण सर्वांनाच तो अंगीकृत करता येइल असं नाही.

 

नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकांना सामोरं जाताना लोकविकासाभीमुख नेतृत्व आमदार सुरेश धस यांनी रोहिदास पाटील गाडेकर यांना संभाव्य नगराध्यक्ष म्हणून घोषीत केले होते. जाहिर सभेत दिलेली अश्वासनपुर्ती म्हणून आमदार सुरेश धस योग्यच नर्णय घेतील यात शंकेचं कारण नाही.

 

हौश्यांचे गुडघ्याला बाशींग 

नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहिर होताच आमदार सुरेश धस यांच्या अश्वासनाला तिलांजली देत  हौश्यांनी सोशल मीडीयावर टि्व टि्वाट सुरू केला आहे.शहरवासीयांनी आमदार सुरेश धस यांच्या नेतत्वावर विश्वास ठेवून बहूमताचा आकडा त्यांच्या पारड्यात टाकला आहे.  त्यामुळे अध्यक्षपदासाठी आमदार सुरेश धस करतील तेच अंतिम असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.