सागवानाची अवैध वाहतूक करणारं वाहन पकडले

वनविभागाची निवळी शिवारात कारवाई तीन घनमिटर सागवान जप्त

0

मुखेड रयतसाक्षी:  तालुक्यातील येवती,बाऱ्हाळी , मुक्रमाबाद , परिसरात सागवान वृक्ष तोड जोमाने सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. असाच प्रकार रविवारी (दि.30) निवळी शिवारात उघडकीस आला. गुप्त माहितीनुसार सागवान वक्षतोड करून अवैध् वाहतूक करणऱ्या वाहन आडउन जवळपास तीन घनमिटर सागवान जप्तीची कारवाई केली आहे .

 

जल्ह्यात सागवान वक्षतोड जोमात सुरू असल्याचे मागील काही दिवसापासून उघडकीस येत आहे. वन विभागाच्या कारवाईला न जुमानता सुरू असलेल्या सागवान वक्षतोडीला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वन संरक्षक ठाकूर यांनी जील्हाभरात मोहिम हाती घेतली आहे.

 

दरम्यान रविवारी बाऱ्हाळी परिसरातील निवळी येथे अवैधरित्या सागवान व्रक्षतोड करून चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना वनविभागा कर्मचाऱ्यांनी अवैध वाहतूक करणरे वाहन आडवले. वाहनचालकाकडे चौकशी करत मिळून आलेले सागवानव्रक्षाचे लाकडं अंदाजे तीन घनमिटर जप्त केले्. वनपरिमंडळ अधिकारी अभय सेवलकर वनरक्षक धम्मपाल सोनकांबळे करीत आहेत. दरम्यान जप्तीच्या कारवाईचा मुद्देमाल वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला आहे.

 

या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी हराळ,वनपरिमंडळ अधिकारी ए. पी.सेवलकर एम.एम पवार वनरक्षक डी. डी सोनकांबळे, पी. एन शिरुरे, आर.के राठोड, ए. एन राठोड,आर.एन कराड,एम जी गोपुलवाड डी. एस घुगे व मेहबूब शेख यांचा समावेश होता.

 

सागवान तस्करीला आळा बसेल

सदर कारवाईत अंदाजित रक्कम 42000 ते 45000 रुपयांचा सागवान व ट्रॅक्टर अंदाजित किंमत दोन लाख हा मुद्देमाल जप्त केल्याने सागवान तस्करी करणाऱ्या टोळीवर चांगलीच जरब बसली आहे. वनविभाग अशा प्रकारे सागवान तस्कर विरोधात धडक मोहीम राबविल्यास निश्चितच सागवान तस्करीवर आळा बसेल अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.