चैन स्नॅचिंग करणारी आंतरराष्टीय टोळी गजाआड

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

0

हिंगोली, रयतसाक्षी  : शहर,जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराष्टीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात हिंगोली पोलीसांना यश आले आहे. कर्नाटकातील बादरशहा पोलीसांच्या सहकार्याने रविवारी हिंगोली गुन्हे अन्वेशन विभागच्या पथकाने ही धाडशी कारवाई राबविली आहे. आरोपींकडून चोरीचे दागीने मुद्देमाल जप्त केला आहे .

 

शहरातील शिवाजीनगर परिसरातून मंदाकिनी सोनमळे या पायी जात असताना मोटारसायकल  वरील दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले होते. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी घटनास्थळी भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक यतीस देशमुख यांना योग्य त्या सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना गुन्हा उघड करण्याबाबत निर्देश दिले.

 

या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. पोलीस पथकाने शहरात अनेक ठिकाणचे व्हिडिओ फुटेज तपासून गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर गुन्ह्यातील आरोपी हे कर्नाटक राज्यातील बिदर येथील प्रख्यात इराणी टोळीचे सदस्य असून या टोळीचा आंतरराज्य टोळीशी संबंध होते. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र,तेलंगणा मध्य प्रदेश,अशा राज्यात अनेक गुन्हे करून फरार होते.

 

त्यांना पकडणे मोठे जिकरीचे असल्याने पोलीस पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत माहिती काढली, असता सदर आरोपी भोपाळ येथून पळून गेले असून रेल्वेने हैदराबादला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांनी बल्लारशहा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क करून समन्वय साधल्याने सदर आरोपी बल्लारशहा पोलिसांच्या मदतीने हिंगोली पोलीस पथकाने बल्लारशा येथून ताब्यात घेतले. आरोपीची विचारपूस केली असता त्यांनी एकूण पाच गुन्ह्याची कबुली दिली, असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चोरीला गेलेले दागिने व अन्य मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.