परळी बीड नगर रेल्वे मार्ग उद्यापासून सुरु

आष्टीपर्यंत धावणार बारा डब्यांची पहिली प्रवाशी रेल्वे

0

आष्टी , रयतसाक्षी: जिल्हा वासियांच्या दृष्टीनं जवळच असलेल्या परळी बीड नगर रेल्वे मार्गावर उद्या पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत असून याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत.

त्यांच्यासमवेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे आणि नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे हे उपस्थित राहणार आहेत.

नगर परळी रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.