नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जातोय, नितेश राणेंचे वक्तव्य; जामीनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

0

मुंबई, रयतसाक्षी: संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ दिलासा दिला होता. मात्र, पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. यानंतर राणेंना दहा दिवसांच्या आत शरण येण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर राणेंनी शरणागती पत्कारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा जामीनाचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.

नितेश राणे काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेऊन मी कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात दाखल होत असल्याची माहिती राणेंनी दिली. राज्यसरकाने बेकायदेशीरपणे मला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करत असल्याचे राणे म्हटले.

न्यायालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.