हिंगोलीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा राडा

संतप्त शेतकऱ्यांची पिकविम्याची मागणी, पिकविमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड

0

हिंगोली, रयतसाक्षी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्याची रक्कम देण्यास कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी दि.2 संतप्त शेतकऱ्यांनी हिंगोली शहरातील पिकविमा कार्यालयातील साहित्यांची तोडफोड केली. वेळेत मागणी मान्य न केल्यास कंपणीचे मुंबईस्थित कार्यलय फोडण्याचा ईशाराही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला.

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन संरक्षीत शेती पिकांसाठी विमा हप्ता भरला. दरम्यान कंपणीने एका बाजूने विमा मंजुर केल्याचे जाहिर करूनही अद्याप शेतकऱ्यांना हक्काच्या पिक विमाचा लाभ दिला गेला नाही. लाभास विलंब करत दूसऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा खेळ मांडला. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा शाखेच्या माध्यमातून वारंवार पिक विमा कंपणीसह जिल्हा अधिक्षक क्र्षी कार्यालयाकडे लेखी व तोंडी पाठपुरव्यासह आंदोलन केली.

मात्र व्यवस्थापनाने जानिवपूर्वक वेळ मारून नेत दिरंगाईची परिसीमा गाठली. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी जिल्हा अधिक्षक क्रषी कार्यालयास शेतकऱ्यांना हक्काच्या पिकविमाचा लाभ देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. निवेदनाची दखल घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने बुधवारी दि.२ स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्या नेतत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी पिक विमा

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.