भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने महामानवास अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोमवारी (दि. ६)६५ व्या महापरिनिर्वाण दिनी मशाल रॅली काढून धम्म वंदनेने अभिवादन करण्यात आले .

0

 

शिरूर कासार, रयतसाक्षी : भारतीय बौद्ध महासभा शिरूर शाखेच्या वतिने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोमवारी (दि. ६)६५ व्या महापरिनिर्वाण दिनी मशाल रॅली काढून धम्म वंदनेने अभिवादन करण्यात आले .

महामानवा, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६५ द्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी शहरातून मशाल फेरी काढून शहरातील कपिल वास्तु बौद्धविहारा मध्ये शेकडो अनुयायांनी बुद्ध वंदनेने अभिवादन केले.

उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले , श्री. बोराडे उपस्थितांनख संबोधित करताना म्हणाले की, भारताच्या कीर्तीवंत सुपुत्रामध्ये बाबासाहेब यांचे नाव आग्रस्थानी आहे. देशाच्या सामाजिक-राजकीय क्षितीजावर त्यांचा उदय१९२०च्या दशकात झाला.समाजात त्यांना अस्पृश्य म्हणून हिणवले गेले.आयुष्यभर त्यांनी सामाजीक व्यवस्थेशी संघर्ष केला.बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारवंत होते. न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीतज्ञ, तत्वज्ञ, पत्रकार, भारतीय संविधानाचे शिल्पकार ,मानवी हक्कांचे कैवारी आणि समाजसुधारक होते.

त्यांनी दलितांच्या, श्रमिकांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी दलित, बौध्द चळवळीला प्रेरणा दिली. समाजातील सामाजिक भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. कारण ते स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. स्त्रियांचे उध्दारक भारतात पुष्कळ झाले. परंतु कैवारी मात्र एकच झाला ते म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचारांचे आचरण काळाची गरज असल्याचे ते म्हणाले .

 

यावेळी बंडू सोनवणे,छत्रपती नन्नवरे,आनंद जावळे,महेबुबभाई शेख,रोहीदास पटील,बबनराव घोरपडे,दत्ता पाटील,बाबूराव झिरपे
युवराज सोनवणे,आरून भालेराव ,दादा हरिदास ,कमलबाई जावळे,शितल शेलार,वैभव शेलार,बाळू शेलार,आक्षय यादव,मनोहर औसरमल,दिलीप माने,आंबादास औसरमल
सुरेखा सोनवणे, पत्रकार प्रमोद निकम आदिंसह शेकडो अनुयायी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.