आष्टी पाटोदा, शिरूर मध्ये आमदार धसांचे धक्कातंत्र

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक, आष्टी, पाटोदा बीनविरोध तर शिरूरमध्ये राष्ट्रवादीची चाल

0

आष्टी, पाटोदा, शिरूर कासार , रयतसाक्षी : नगर पंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी भाजपकडून आष्टीमध्ये पल्लवी धोंडे, पाटोद्यात सय्यद खतीजाबी आणि शिरूर मध्ये प्रतिभा गाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मदार सुरेश धस यांनी या तिन्ही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे.  नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असताना धस यांनी प्रस्थापितांना संधी दिल्याने भल्या भल्यांचे भुवया उंचावल्या आहेत. शिरूरमध्ये राष्ट्रवादीने उमेदवारी दाखल करून भाजप विरोधात चाल केली आहे.

नगर पंचायत च्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या.बीड जिल्ह्यात आष्टी,पाटोदा आणि शिरूर मध्ये भाजपने बाजी मारली तर वडवणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारली होती.केजमध्ये जनविकास आघाडीसोबत काँग्रेस ने युती केल्याने तेथे त्यांचा नगराध्यक्ष होणार आहे.

आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी रंगनाथ धोंडे यांची सुन सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.तर पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद अबुशेठ यांची भावजाई सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची बिनविरोध निवड फायनल झाली आहे.तसेच शिरूरकासार नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून सौ.प्रतिभाताई रोहिदास गाडेकर यांनी अर्ज दाखल केला आहे तर राष्ट्रवादी कडून शेख शयाना नसीर यांनी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदासाठी गरज भासल्यास हात वरकरून मतदान प्रक्रियेनंतर सोमवारी दि.१४ निवड जाहिर होणार आहे.

रयतसाक्षीचा अंदाज खरा ठरला: शिरूर कासार नगरपंचायत अध्यक्षपदासाठी ईच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. सोशल मिडीयावर अध्यक्षपदावर दाव्याच्या पोस्ट व्हायरल करत भाजपचे आमदार सुरेश धस याना कुरवाळण्याचा खटाटोप सुरू होता. मात्र आमदार सुरेश धस यांनी जाहिर सभेत अध्यक्षपदासाठी प्रतिभा रोहिदास गाडेकर यांचे अध्यपदासाठी नांव जाहिर केले होते. त्याच अनुषंगाने रयतसाक्षी मधून दि. ५ रोजी , अध्यक्षपदाचा बहुमान प्रतिभा वंतांनाच , या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. भाजपकडून एकमेव प्रतिभा रोहिदास गाडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने रयतसाक्षीचा अंदाज खरा ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.