स्मशानभुतीत जागे अभावी दलित महिलेचे तहसीलच्या दारात

धारूर तालुक्यातील गावदंरा येथील घटना, बारा तासानंतर अतिक्रमणातील ऊस तोडल्यानंतर प्रेत नातेवाईकांनी घेतले ताब्यात

0

किल्लेधारूर, रयतसाक्षी: तालूक्यातील गावदंरा येथे दलीत समाजाचे वहीवाटी प्रमाणे असलेल्या स्मशानभुमी सह रस्ता अतिक्रमीत झाल्याने दलित समाजास अंत्यविधीस अडथळा नर्माण होत होता. सोमवारी (दि.९) गावातील एका वृध्द महीलेच्या अंत्यविधीस जागा नसल्याने संतप्त नातेवाईकांनी मृतदेह तहसीलकार्यालयाच्या दारात आणुन ठेवला. स्मशानभुमीतील अतिक्रमण हटविल्या शिवाय प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने प्रशासनाने तब्बल बारा तासानंतर अतिक्रमीत ऊस पीक हटविल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तालूक्यातील गावदंरा येथे दलित समाजाची वहीवाटी प्रमाणे गावठाण् हद्दीत स्मशानभुमीसह रस्त्यावर गावातील एकाने अतिक्रमण केले होते. दरम्यान गेल्या दहा वर्षापासून अतिक्रमीत स्मशानभुमीत अंत्यसंस्काराठी समाजास यातना सोसाव्या लागत होत्या. या शिवाय आतिक्रमण धारकाच्या रोषालाही सामोरं जावं लागत असल्याने जवळपास एक तपा पासून मृत्यू नंतरही समाजातील लोकांना अंत्यविधीसाठी समस्यांना तोंड द्यावी लागत होती.

 

सोमवार (दि.७) गावातील महीला सरूबाई मारूती सौंदरमल ९० वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वहिवाटा प्रमाणे मयताच्या अंत्यविधीसाठी स्मशानभुमीकडे जात असताना अतिक्रमण धारक गोरख दत्तू बडे यांनी अंत्ययात्रा रोखून अंत्यविधीस विरोध केला. त्यामुळे संतप्त नातेवाईक ग्रामस्थांनी मयत सरूबाई मारूती सौंदरमल यांचा मृतदेह थेट धारूर तहसीलच्या दारात आणुण ठेवला. अचानक असा प्रकार घडल्याने प्रशासनाची काही वेळ चांगलीच तारांबळ उडाली. तहसीलदार व्हि एस शिडोळकर यांनी अंत्यविधीत सहभागी मयतांच्या नातेवाईक ग्रामस्थांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मशानभुमीतील अतिक्रमण हटवून सर्व स्मशानभुमी मोकळी केल्या शिवाय प्रेतावर अंत्यसंस्कारास विरोध केला.

 

घटनेचे गांभीर्य राखून प्रशसनाकडून तात्काळ सुत्रे हलविण्यात आली. तालुका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावंदरा येथील दलित स्मशानभुमी गाठुन वहिवाट स्मशानभुमीची तातडीने मोजणी करून अतिक्रमीत ऊस पीक तोडून सर्व स्मशानभुमी मोकळी केली. त्या नंतर मृत्यू पश्चात तब्बल २६ तासानंतर व तहसीलच्या दारातून बारा तासानंतर मयतावर गावातील दलित स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान तहसीलच्या दारात मृतदेह ठेवल्याने कार्यालयात पोलीसांचा फौजपाटा तैनात करण्यात आला होता. मयताच्या नातेवाईकांसमवेत विविध संघटनांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.