उमरापाटी च्या कृषी बाजारात जबरी चोरी

पोलीस अधिक्षकांकडून घटनास्थळाची पहाणी, चोरटे फरार

0

हिंगोली , रयतसाक्षी : हिंगोली-कळमनुरी रस्त्यावरील उमरा पाटीजवळील गजानन कृषी बाजार याठिकाणी चोरट्यांनी सुरक्षारक्षकास लोखंडी रॉडचा धाक दाखवून जवळपास ४० हजार रूपयांची रोक रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.८) पहाटेच्या दरम्यान घडली. जबरी चोरीची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर  यांनी घटनास्थ्ळाची पहाणी करून तपासाचे निर्देश दिले.

उमरापाटी येथील कृषी बाजारात दिवसभर शेतमालाच्या खरेदी विक्रीमुळे लाखोंची उलाढाल होते. शेतकारी ग्राहकांच्या नेहमी राबता असल्याने कृषी बाजारात नेहमी गर्दी, वर्दळ असते. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी येथील सुरक्षारक्षकास लोखंडी रॉडचा धाक केबिनची तोडफोड करत चाळीस हजारांची रोकड पळविली. या घटनेने जिल्ह्यात एकच ख्ळबळ उडाली आहे.

माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, विशाल खंडागळे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधिक्षक एम. राकेश यांनी तपासकामी अवश्यक सुचना देत फरार चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे यंत्रणेला निर्देश दले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.