चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी माफियांवर गुन्हा

चार माफियांचा समावेश ,गेवराई पोलीसात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

0

गेवराई, रयतसाक्षी: गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे वाळूमाफियांनी नदीपात्रात खोदलेल्या खड्यामध्ये बुडून चार चिमुकल्यांचा दि.७ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्हाभरात वाळू माफियांविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानुसार गेवराई पोलीसांनी गुरूवारी बालकांच्या मृत्यूस कारणीभूत चार माफियांविरोधात सदोस मणुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत.

बीड तालुक्यातील शहाजानपूर चकला येथ्ल सिंदफणा नदीपात्रात अवैध वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्यातील पाण्यात बुडून मागील आठवड्यामध्ये चार बालाकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान वाळू माफियांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईकांनी नदीपात्रातच मृतदेह ठेऊन आंदोलन केले. या गेवराई-बीड प्रशासनाने हद्दीचे कारण पुढे सारत कारवाईस विलंब केल्याने घटनास्थ्ळावर तनावाचे वातावरण निण्र्माण् झाले होते.

 

घटनेचे गांभिर्य राखून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांनी तातडीने योग्य कारवाईच्या सुचना दिल्या. शिवाय माजी मंत्री पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर यांनीही दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यानुसार गुरूवारी दि १० तांदळवाडी येथील वाळू माफिया पांडूरंग चोरमले, विलास निर्मळ, संदिप निर्मळ, आणि आर्जुन कोळेकर सर्व राहणार तांदळवाडी ता. बीड या चौघांविरोधत गेवराई पोलीस ठाण्यात सदोष मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान हे वाळू माफिया अनेक दिवसांपासून सिंदफणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करत होते. चारही आरोपी सध्या फरार असून गेवराई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई मकरण्याची मागण् मुख्य सविवांकडे गेवराई विधानसभ मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण् पवार यांनी केली आहे. यामुळे येणऱ्या काळात दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच यातीली चारही आरोपी फरार झालेच कसे ? बसा प्रश्न आता सामान्य नागरिकांतून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.