उमेदवारीसाठी इच्छुकांच्या पक्षश्रेष्ठींसमोर पायघड्या !

निवडीच्या समिकरणांना वेग; लाॅबिंगसाठी खलबते

0

शिरुर कासार, रयतसाक्षी: शिरूर कासार नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकी साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा काही तासांचा‌ कालावधी उरला आहे. मातब्बरांसह ईच्छुकांमध्ये फिल्डींगचीच खलबते सुरू झाली आहेत. उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींसमोर एकनिष्ठ तेच्या आणा-भाका घेतल्या जात असल्यातरी मंगळवारी ( दि.७) उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकांसाठी भाजपाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी स्वबळाचा शड्ड ठोकला आहे . राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांनी स्वबळासाठी तुल्यबळातील उमेदवारांच्या चाचपण्या केल्या आहेत.
आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतीच्या मागिल पंचवार्षीक निवडणूकां राष्ट्रवादीने आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या . आमदार सुरेश धस यांनी तीनही नगरपंचायतीवर राष्ट्रवादी चा झेंडा फडकावला. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत च्य वये कालावधी आमदार सुरेश धस यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याने आष्टी, पाटोदा , शिरूर नगरपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या.

शिरूर नगरपंचायतीच्या एकून १७ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी घ्या तीन पैकी एकाचे पद रद्द झाले तर उर्वरित दोन नगरसेवकांनी सभागृहात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले.
मुदत संपल्याने नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात गेला .

आमदारा सुरेश धस यांचे एके काळातील उजवा हात संबोधले जाणारे महेबुब‌शेख यांना राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्षपदावर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले. नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकांच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी भाजपा या तीनही पक्षांच्या माब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे .

त्यामुळे एके काळचे गुरू-शिष्य प्रचारात दरम्यान आमने सामने पहायला मिळणार असले तरी पवार घराण्याचे विश्वासु व जवळचे राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या खांद्यावर राज्याची धुरा आल्यानंतर जन्मभुमितील त्यांच्या नेतृत्वातली ही पहिलीच निवडणूक मानली जात आहे.

उमेदवारीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम कालावधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने इच्छुकांमध्ये पक्षांच्या उमेदवारीसाठी चुरस लागली आहे. आपापल्यापरिने‌ पक्षश्रेष्ठींसमोर बाजू मांडत पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असली तरी काही तासात पक्षाकडून उमेदवारांच्या जाहीर होणार असल्याने मतदारांची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.