जिल्हा रूग्णालयातून फरार आरोपीस अटक

हिंगोली पोलीस पथकाची कारवाई

0

हिंगोली, रयतसाक्षी : जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस वैद्यकीय तपासणीसाठी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले होते. परंतु पोलिसांना चकमा देऊन आरोपी विजय रमेश भगत रा. कानडखेडा हा फरार झाला होता. अखेर हिंगोली  पोलीसांच्या पथकाने फरार आरोपीस नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

 

गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी विजय भगत यास वैद्यकिय तपासणीसाठी गोरेगाव पोलीसांनी हिंगोली जिल्हा रूग्णालयात दाखल केले . दरम्यान या वेळी आरोपी विजय भगत याने कर्तव्यावर रूजू गोरेगाव पोलीसांना चकमा देत जिल्हारूग्णालयातून पळ काढला.

दरम्यान आरोपी पोलीसांना चकमा देत फरार होण्यात यशस्वी झाल्याने पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक येतिश देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी विविध पथक स्थापन केली. फरार आरोपीचा पथकाद्वारे शोध घेतला जात होता. तपासादरम्यान आरोपी विजय भगत यास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. आरोपी  शोध मोहिमेच्या कारवाईत गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील तसेच पोलिस कर्मचारी राहुल गोटरे, काशिनाथ शिंदे, शिवाजी शिंदे, नवनाथ शिंदे, अमोल जाधव आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.