जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांची आज निवड

उपनगराध्यक्षपदांसाठी रस्सीखेच, मातब्बरांची स्वीकृतीवर मदार!

0

शिरूर कासार, रयतसाक्षी:  जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या नगराध्यांची निवड आज होत आहे. दरम्यान आष्टी, पाटोदा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखली भाजपकडून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने दोन्ही नगराध्यक्षपदाची बिनविरोध् निवडप्रक्रिची औपचारीकता बाकी आहे. शिरूर कासार नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रतिभा रोहिदास गाडेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असला तरी राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये १७ पैकी ११ संख्याबळ असलेल्या भाजपच्या प्रतिभा  रोहिदास गाडेकर यांची निवड निश्चित मानली जात असली तरी सभागृहात मतदान प्रक्रियेनंत अधिकृत घोषणा होणार आहे.

 

जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी, केज या पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांची आज निवड होत आहे. केज नगरपंचायतीमध्ये जनविकास आघाडीला स्पष्ठ बहूमत मिळाल्याने अध्यक्षपदासाठी सिता बनसोड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वडवणीमध्ये राष्ट्र्वादीच्या वंदना जगताप यांचा तर भाजपकडून मंगल मुंडे यांचा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आष्टी नगरपंचायातीच्या नगराध्यक्षपदासाठी पल्लवी धोंडे तर पाटोदा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष सय्यद आब्दुल्ला यांच्या गटाला संधी देण्यात आली आहे. निवड प्रक्रियेच्या जाहिर कार्यक्रमानुसार नगराध्यक्ष निवडीसोबतच उपनगराध्यक्षपदाच्याही निवडी जाहिर करावयाच्या असल्याने पक्षश्रेष्ठींकडे उपनगराध्यपदासाठी मातब्बरांकडून अंतिम टप्यातील फिंल्डीग लावण्यात येत आहे.

 

अध्यक्षपदावरील दावा सुटल्या नंतर किमान उपाध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी दावेदारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर, पक्षश्रेष्ठींचा आदेश मानत निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवारीपासून अलिप्त राहिलेल्यांसह प्रचारासाठी झोकून दिलेल्यांची स्वीकृतीवर मदार आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर कासार नगरपंचायतीमध्ये भाजप आमदार सुरेश धस ठरवतील तेच होणार यासाठी कुठल्या भविष्यवेत्याची अवश्यकता आता राहीलेली नाही.

दरम्यान आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचात समितीच्या निवडणूकीसाठी  सामाजीक समन्वयाच्या उद्देशाने नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडी महत्वाच्या मानल्या जात आहेत . प्रत्यक्षात ग्रामीण आणि शहराचे राजकिय समीकरण वेगळे असले तरी शहराच्या राजकिय हालचालींवर ग्रामीण राजकारणावर परिनाम होतो यात शंका नाही. त्यामुळे राजकियपटलावरील एक अभ्यासु नेतृत्व म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस यांची ख्यातील आहे. नगरपंचायत निवडीतून आमदार धस आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी समाजीक समतोलाची मशागत करणार असल्याच्या भावना तज्ञांतून व्यक्त होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.