हिंगोलीत मोटारसायकल चोर टोळीचा पर्दाफाश

तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात, हिंगोलीसह परभणी, वाशीम जिल्ह्यातून केली मोटारसायकलींची चोरी

0

हिंगोली , रयतसाक्षी: हिंगोलीसह परभणी, वाशीम जिल्ह्यात मोटारसायक चोरी करणाऱ्या टोळीचा हिंगोली पोलीसांनी मंगळवारी दि.१५ पर्दाफास केला आहे. हिंगोली पोलीस अधिक्षक एम. राकेश यांच्या पथकाने मोटारसायकल चोर टोळीतील तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या मोटारसायकलींसह एकून सात लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंगोलीसह परभणी, वाशीम जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. सराइत मोटारसायकल चोर वारंवार पोलीसांना चकमा देण्यात यशस्वी होत असल्याने मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळणे हिंगोली पोलीसांसमोर अव्हान होते. पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी मोटारसायकल चोरीच्या घटनांचा कसुन तपास करण्याच्या सुचना हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना दिल्या होत्या.

 

दरम्यान, पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांच्या सुचनांनुसार आरोपींच्या मुसक्या आवळ्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आली. पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार बालाजी बोके, शंकर ठोंबरे, किशोर सावंत आकाश टापरे आदींनी तपासाची चक्रे फिरउन आरोपींचा शोध घेतला. गोपनीय माहितीनुसार आरोपी शेख शोयब उर्फ रीबिल शेख युनूस, शेख अशपाक शेख अफसर,  साजिद खान रहमान खान पठाण आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी आरोपींनी चोरीच्या एकूण १४ मोटरसायकली काढून दिल्या.

 

त्यापैकी हिंगोली जिल्ह्यातून १२ मोटरसायकल आरोपींनी चोरल्याची कबुली दिली. या पैकी एक मोटारसायकल रिसोड येथून तर एक मोटारसायकल परभणी येथून चोरल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे.  हिंगोली पोलिसांनी १४ मोटरसायकल ताब्यात घेऊन १२ गुन्हे उघड केले आहेत.

 

या कारवाईत आरोपीकडील एकूण सात लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार बालाजी बोके शंकर जाधव भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, शेख शकील, नितीन गोरे, शंकर ठोंबरे राजू ठाकुर, विशाल घोळवे, किशोर कातकडे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.