अपघातात मृत्यू पावलेल्यांना नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

दोन अपघातातील मृयतांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा मा. बीड न्यायालयाचा निकाल

0

आष्टी, रयतसाक्षी : आष्टी-जामखेड लगत असणाऱ्या पोखरी व बार्शी नाका बीड या दोन ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पावलेल्या दोन नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी ६९ लक्ष व ३५ लक्ष रुपये देण्याचे मा.मोटार अपघात दावे प्राधीकरण बीड यांनी आदेशित केले आहे.
सन २०१५ साली जामखेड येथून आष्टीकडे येत असताना रस्त्यावर भरधाव वेगाने राॕकेलच्या टॕकरने दुचाकीवर असलेल्या दत्ताञय सोमिनाथ भालके रा.केळसांगवी व बद्रीनाथ छगन विधाते यांना जोराची धडक दिली होती.

यामध्ये दत्ताञय सोमिनाथ भालके हे जागीच ठार झाले तर बद्रीनाथ विधाते हे गंभीर जखमी झाले होते.तर सन २०१६ साली बार्शीनाका बीड येथून आपल्या दुचाकीवर मुळ गावी परतणा-या इट ता.भूम येथील राहूल दिलीप भोसले व वैभव लोहार यांना पाठीमागून येणा-या चारचाकी वाहनाची जोरात धडक बसलली.

या अपघातामध्ये राहूल दिलीप भोसले वय २८ वर्षे या तरुणाचा उपचारा दरम्यान पुणे येथे मृत्यू झाला.या दोन्ही मयत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनी संबंधीत वाहनधारकावर गुन्हा नोंदविला होता.

मा.मोटार अपघात दावे प्राधीकरण बीड यांच्या न्यायालयात या प्रकरणाची अखेरची सुनावणी नुकतीच झाली.ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात मयत झालेले पैकी दत्ताञय सोमिनाथ भालके यांच्या कुटुंबियांना ६९ लक्ष ३१ हजार सातशे तर राहूल दिलीप भोसले यांच्या कुटुंबियांना ३५ लक्ष ३४ हजार रुपये विमा रक्कम देण्याचे संबंधित विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले.आष्टी शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ अॕड.अभिजीत गव्हाणे यांनी सदरील प्रकरण न्यायालयात चालवले होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.