अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस शिक्षा

आजन्म कारावास व २५ हजार दंडाची शिक्षा; हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

0

हिंगोली, रयतसाक्षी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधम आरोपीस आजन्म कारावास व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी पालदेवार यांनी मंगळवारी दि. १५ सुनावली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध २०१८ मध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. केंद्रे यांनी गुन्ह्याचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले.

 

दरम्यान हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी पालदेवार यांच्यासमोर चालले. यामध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सविता एस. देशमुख यांनी एकूण १४ साक्षीदार तपासले. फिर्यादी आणि पीडिता तसेच इतर साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी पालदेवार यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी मधुकर निवृत्ती वाठोरे राहणार बावनखोली यास कलम ३७६ (अब) भादंवि नुसार दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा,

 

तसेच कलम ५०६ (२) भादंवि नुसार पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल दोषी ठरवून पाच वर्ष सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याची कारावासाची शिक्षा तसेच कलम ९ एम बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ नुसार दोषी ठरवून सात वर्ष सक्षम कारावास व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सविता एस.देशमुख, यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी वकील एस.डी कुटे, एन. एस मुटकुळे तसेच तत्कालीन सहायक सरकारी वकील एस एम पठाडे यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.