भीषण अपघातात नवरीसह पाच जण ठार…नवरदेव गंभीर…नांदेड जिल्ह्यातील घटना…

एका मँक्सॊमो क्र. एम एच 29 AR 3219 गाडीने सोमवारी जात होते.

0

नांदेड , रयतसाक्षी: भोकर रोडवरील भिषण अपघातात नवरीसह पाच जण ठार झाल्याची हृदयदावक घटना घडली आहे. भोकर पासून मौजे सोमठाणा जवळील साई ढाब्याजवळ जारिकोट धर्माबाद तालुक्यातील नवरदेव नागेशकर साहेबराव कनेवाड रा.जारीकोट यांच्या लग्न घरातील नातेवाईक सारखणी ता.उमरखेड येथे लग्नानंतर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी एका मँक्सॊमो क्र. एम एच 29 AR 3219 गाडीने सोमवारी जात होते.

हिमायतनगरकडून भोकर कडे येणाऱ्या विट गाडी क्र एम एच 04 AL 9955 ने सायंकाळी सहाच्या सुमारास सोमठाण्याजवळील एका धाब्याजवळ समोरासमोर जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की,त्यामध्ये मँक्सॊमोतील पाच लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.. या अपघातामध्ये मृतामध्ये लग्न झालेल्या मुलीचा समावेश आहे तर नवरदेव नागेश कनेवाड गंभीर असल्याचे ग्रामीण रुग्णालयातुन सांगण्यात आले असुन या मँक्सीमो गाडीमध्ये १२ लोक होते असे समजते.

या घटनेमध्ये गंभीर असलेल्या सहा ते सात लोकांना भोकर शासकीय रुग्णालयांत दाखल केले असल्याचे सांगण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी गोपाळ रांजणकर आणि पोलिस निरिक्षक विकास पाटील त्यांच्या सह सहाय्यक पोलिस निरीक्षक रसुल तांबोळी,पोलिस उपनिरिक्षक अनिल कांबळे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.पुढील तपास पोलिस ठाणे भोकर यांच्याकडुन सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.