जामखेड मध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या

0

जामखेड, रयतसाक्षी : जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक साहेब यांना इडी मार्फत झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज जामखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या वतीने खर्डा चौक येथे धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

 

केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करून विरोधातील आवाज दाबण्याची केंद्र सरकारची आणि भाजपची ही मुजोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या

 

नवाब मलिक हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री देवेंद्र फडणवीस व किरीट सोमय्या यांनी कटकारस्थान करून खोटे आरोप लावून वीस वर्षापूर्वीच्या जमीन व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्यांना कोणतीही नोटीस न देता अटक करण्यात आली.

 

जोपर्यंत नवाब मलिक बाहेर येत नाहीत तोपर्यंत स्वस्थ न बसता सातत्याने आंदोलन करण्याचा इशारा महा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला.मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ खर्डा चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख मधुकर आबा राळेभात, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, उमर कुरेशी, वसीम सय्यद, फिरोज पठाण, जमीर भाई सय्यद, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस राहुल उगले, अमित जाधव, प्रकाश काळे, अमोल गिरमे, फिरोज बागवान, प्रा. विकी घायतडक सर, इमरान कुरेशी, अण्णा ढवळे, देविदास भादलकर, अमित जाधव, इस्माईलभाई सय्यद, कुंदन राळेभात, अहिरे  सर, लोहकरे, प्रकाश सदाफुले, दादा रिटे, गणेश वारे, महिंद्रा राळेभात, महेश राळेभात, काकासाहेब कोल्हे हरिभाऊ आजबे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.