रात्रीच्या जेवनातून विषबाधा

तीन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू आईची प्रकृती चिंताजनक !

0

आंबाजोगाई, रयतसाक्षी : आंबाजोगाई तालुक्यातील नागझरी येथे जेवनातून विषबाध होऊन तिन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आंबाजोगाईच्या शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधेने तिन भावंडाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत असून आईची रूग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

 

वागझरी येथील काशीनाथ धारसुरे यांनी शुक्रवारी दि. २५ कुटुंबासमवेत रात्रीचे जेवन केले. शिनवारी दि. २६ सकाळी साधना वय ६ व श्रावणी वय ४, नारायण वय ८ महिणे यांना त्रास होऊ लागल्याने या तिन्ही भावंडाचा मृत्यू झाला. या तिन चिमुकल्यांची आई भाग्यश्री यांनाही त्रास होऊ लागल्याने उपचारार्थ आंबाजोगाईच्या शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता रात्रीच्या जेवनातून विषबाधेचा अंदाज येथील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

 

जेवनातून विषबाधेमुळे तिन्ही चिमुकल्या भावंडाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत असून भाग्यश्री धारसुरे वय २८ यांची आंबाजोगाईच्या शासकिय रूग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. विषबाधेचे नेमके कारण समजु शकले नाही मात्र, डॉक्टरांच्या माहितीनुसार पोलीसांनी धारसुरे कुटुंबीयांनी रात्री केलेल्या जेवनाचे नमुने घेतले आहेत. तपासणी अहवालानंतरच विषबाधेचे कारण समोर येणार असले तरी या दुर्दैवी घटनेत तिन चिमुल्या भावंडांना आपला जिव गमावा लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.