बीडमध्ये आमदार पित्यासह इतरांवर गुन्हा

जमीन खरेदीतून गोळीबाराचे प्रकरण विकोपाला !

0

बीड, रयतसाक्षी : बीडच्या राजीस्र्टी कार्यालयासकोर काल दोन गटात जमीनीच्या वादातून भांडणाचे पर्यावसान थेट गोळीबारापर्यंत गेल्याने खळबळ उडाली होती. गोळीबारामध्ये चार राऊंड करण्यात आल्याचे निष्पंन्न झाले असून दोघांना बंदुकीच्या गोळ्या लागल्या आहेत. जखमींच्या फिर्यादीवरून आरोपी विरेधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रजीस्र्टी कार्यालयात कुकरीने हल्ला करत रजिस्र्ट करण्यापासून रोखल्याप्रकरणी सतीश पवार यांच्या फिर्यादीवरून रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्यासह इतरांवर प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दि.२५ शहरातील रजीस्र्टी कार्यालयात गोळीबाराची घटना घडल्याचे पडसाद शनिवारी दि.२६ उमटले आहेत.

 

या दरम्यान सतीश पवार यांनी फिर्यादीत नमुद केल्या प्रमाणे  सतीश पवार व इतर जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून जागा खरेदी प्रकरणी रजीस्र्टी करत असताना रविद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर , फारूख सिद्दीकी , आनंद पवार , गणेश भरनाळे, अशोक रोमण आदींनी रजिस्र्टी कार्यालयात येऊन रजिस्र्टी का करतो म्हणून मारहान केली. तसेच कुकरीने हल्ला करण्याचा प्रयत्न करत लाखोंची रोख रक्कम लांबविल्याची फिर्याद सतीश पवार यांची बहीण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी दिली आहे.

 

प्रतिभा क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविंद्र क्षीरसागर यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोळीबार प्रकरणामुळे क्षीरसागर कुटुंबातील वाद अधिक चिघळल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,  या गुन्ह्यात आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील आणि भावांचाही समावेश असल्याने ह प्रकरण कोणत्या टोकाला जाईल याची शास्वती नसल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.