पालख्या डोंगरावर मानवी सांगडा आढळल्याने खळबळ

झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला सांगडा, आत्महत्या की घातपात ?

0

गेवराई, रयतसाक्षी : शहरापासून जवळ असलेल्या पालख्या डोंगरावर एक मानवी शरीराचा सांगाडा सापडला असुन त्याचे शिर झाडाला टांगलेले तर धडाचा सापळा जमीनीवर पडलेल्या आवस्थेत अढळून आला आहे. अनोळखी व्यक्तीचा सांगडा अशा अवस्थेत अढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केली की, त्याचा कोणी घात केला ? हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.

 

तालुक्यातील पालख्या डोंगरावर एक बेवारस दुचाकी पडलेली आहे,  अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावर जावुन पाहणी केली. तेंव्हा एका झाडाला मानवी सांगाडा लटकलेलेल्या आवस्थेत अढळून आला. यामधे त्याचे शिर झाडाला टांगलेले तर शरीराचा पुर्ण भाग  जमीनीवर पडलेल्या आवस्थेत होता.

पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन अनोळखी व्यक्तीचा सांगाडा तपासणीसाठी आंबाजोगाई येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरीकांमधे भितीचे वातावरण नर्माण झाले आहे. मागील दिड महिन्यापूर्वी एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या मानवी सांगाड्याचा आहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेचे सत्य समोर येणार असून हा घातपात की, आत्महत्या ? हे स्पष्ट होईल अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.