मुद्देमालासह पकडला विद्युत मोटार चोरटा

पांढरवाडी शिवारात डी. बी. पथकाची कारवाई

0

गेवराई, रयतसाक्षी : तालुक्यातील अनेक भागातून शेतातील विद्युत मोटर चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात दिनांक 26 फेब्रुवारी सकाळी पांढरवाडी शिवारात डी.बी. पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे यांना गुप्त हेरा मार्फत माहिती मिळाल्या नंतर एक विद्युत मोटार चोरटा त्या ठिकाणी आढळून आला.

 

त्याच्याकडे लक्ष्मी कंपनीची विद्युत मोटार, वायर, पाईप असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला राधाकिसण गायकवाड रा. संजयनगर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून आणखीही धागेदोरे यातून मिळतील अशी माहिती डीबी पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे यांनी दिली ही कारवाई डी. बी. पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल पारधी,गोरे,सिधकी, यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.