चिमुकल्यांचा मृत्यूची घटना वेदनादायक

मा.मंत्रीपंकजा मुंडेंनी व्यक्त केली हळहळ

0

परळी, रयतसाक्षी : बागझरी ता. अंबाजोगाई येथे झालेल्या चिमुकल्यांच्या मृत्यूची घटना अतिशय वेदनादायक असून मनाला चटका लावणारी आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मा. मंत्री पंकजा मुंडे यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

 

बागझरी  येथील काशीनाथ दत्तू धारासुरे या शेतमजुराच्या  कुटुंबातील श्रावणी  (वय 4), साधना ( वय 5 ) या दोघींचा सकाळी मृत्यू झाला, त्यानंतर अवघ्या काही तासात आठ महिन्याचे बाळ असलेल्या नारायण याचाही दुर्देवी मृत्यू झाला. या लेकरांची आई भाग्यश्री धारासुरे (28) यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले. धारासुरे कुटुंबाने घेतलेल्या  रात्रीच्या जेवणानंतर सकाळी हा प्रकार घडल्याचे समजले. पंकजा मुंडे यांनी या घटनेची माहिती कार्यकर्त्यांकडून घेतली आणि चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.