१२ मार्च रोजी होणाऱ्या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा- न्या. ए. टी. मनगिरे

सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी दिनांक १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व मा. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार दि. १२ मार्च रोजी शिरूर कासार येथील न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन येथील विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी केले आहे.

 

या बाबत माहिती अशी की,मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार  व मा. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार न्यायालयात असणारे प्रलंबित दिवाणी दावे,दाखल पूर्व प्रकरण,बँकेची कर्ज प्रकरणे, चेक बाबतची प्रकरणे,ग्रामपंचायत, नगर पंचायतची थकबाकी प्रकरणे,घरगुती कौटुंबिक वाद ,पोटगीची प्रकरणे,आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे हे सामोपचाराने आपसात तडजोड करण्यासाठी दिनांक १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कोविड १९ या आजाराच्या बाबतीत असणाऱ्या सर्व नियमावलीचे पालन करून करण्यात आले असून पक्षकारांनी आपली न्यायालयात दाखल असलेली व दाखल पूर्व प्रकरणे हे लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपसात तडजोड करून घ्यावीत व न्यायालयात येताना प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे आपसात वैयक्तिक अंतर राखणे व हँड सॅनिटाझरने हात स्वच्छ धुवूनच प्रवेश करावा आणि लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीश ए. टी. मनगिरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.