संजय पांडे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरुन बदली

0

मुंबई, रयतसाक्षी : मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली झाली आहे. यामुळे आता त्यांच्या जागी वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय पांडेंची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला होता. आता संजय पांडे यांच्यावर मुंबई पोलिस दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

नुकत्यात झालेल्या बदल्यांमुळे पांडे यांची राज्य सरकारवर नाराजी होती. मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन परमबीर सिंहांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागली होती. यामुळे संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले होते. यामुळे ते नाराज होते. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान आता राज्य सरकारने संजय पांडेंची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून बदली केली आहे.

 

कोण आहेत मुंबई पोलिसचे नवीन कमिश्नर पांडे?

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. IIT कानपूरचे 1986 च्या बॅचचे IPS अधिकारी, संजय पांडे 1992-93 च्या दंगलीत DCP होते. यादरम्यान त्यांनी खूप कमी वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याचे बोलले जाते. त्यानंतर ते नार्कोटिक्स, इकॉनॉमिक्स ऑफेंस विंगमध्येही राहिले आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळणाऱ्या संजय पांडे यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीचीही जबाबदारी सांभाळली होती. मात्र, आयपीएस रजनीश सेठ यांची महाराष्ट्र पोलिसांच्या डीजीपीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.