वैज्ञानिक जाणिवांसह जीवसंवर्धनही होणे गरजेचे- साहित्यिक विठ्ठल जाधव

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कथाकथनातून संदेश

0

शिरूरकासार, रयतसाक्षी: पर्यावरण रक्षणासाठी मानवाने अव्याहतपणे झगडले पाहिजे. वैज्ञानिक जाणिवांसह जीवसंवर्धनही महत्त्वाचे आहे असा संदेश प्रसिद्ध बाल साहित्यिक विठ्ठल जाधव यांनी कथाकथनातून दिला. तालुक्यातील लिंबा येथील उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे दि.२८ रोजी आयोजन करण्यात आले.

 

मुलांमध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. सी.व्ही. रमन जयंतीदिनी गुणवत्तापूर्ण प्रयोगांसाठी बक्षिसांचे वितरण करण्यात आले. बालवयात वैज्ञानिक सत्य माहिती झाल्यास भावी जीवन सुलभ होते. विवेकशील नागरिक बनतील आणि ते राष्ट्र हितासाठी योग्य असते असे सांगत वन्यजीव संरक्षणाची भूमिका मांडणारी ‛आरोळी’ ही कथा साहित्यिक विठ्ठल जाधव यांनी अभिनयासह सादर केली.

 

आपल्या ‛पांढरा कावळा’ कादंबरीतील वैज्ञानिक सत्य विशद केले. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी तल्लीन होऊन कथाकथनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक सप्रे हे होते. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय धांडे, किशोर सुपेकर, सिकंदर वाघवाले, मोहन घुगे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन शिवाजी शिंदे यांनी केले. तर आभार सुनिल परजणे यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.