शिवरायांचे रामदास कधीच गुरू नव्हते, हाच खरा इतिहास

रामदासी घुसखोरीवर छत्रपती उदयनराजे भोसले भडकले

0

सातारा, रयतसाक्षी : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलंय यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळं नव्या वादाला सुरवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केलं होत. यास वादग्रस्त विधानावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

खासदार उदयनराजेंनी टिव्टद्वारे राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले राष्र्टमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या. तर रामदास हे कधीही गुरू नव्हते . हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

 

खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य कारायला हवं होतं. त्याच्या वक्तव्यामुळं संपूर्ण् महाराष्र्टाच्या भावना दुखावल्या आहेत तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरीत मागं घ्याव, असं अवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.