भारती महाराजांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

बेलेश्वर संस्थानचे भारती महाराज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

0

बीड, रयतसाक्षी : बीड तालुक्यातील बेलेश्वर संस्थानचे महंत भारती महाराज यांच्यासह डॉ सचिन जायभाये यांना खंडणीसाठी धमकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

आज बेलेश्वर संस्थांनचे भारती महाराज यांना अनोळखी मोबाईल क्रमांकाद्वारे ‘तुमचा जीव वाचवायचा असेल तर चार लाख द्या’ अशी मागणी करण्यात आली. यानंतर काही वेळाने याच मोबाईल क्रमांकाद्वारे लिंबागणेश येथील डॉक्टर सचिन जायभाये यांना ‘तुमची सुपारी 45 लाखाची असून जीव वाचवायचा असेल तर पैसे द्या’ अशी मागणी करण्यात आली.

 

या दोघांनी नेकनुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून दोघांनाही एकाच नंबर वरून कॉल आले असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी शोध सुरू केला आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात बेलेश्वर संस्थान आहे.

 

बीड तालुक्यातील बेलेश्वर संस्थान हे हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्री उत्सव सुरू असून अशातच भारती महाराजांना धकमी आल्याने भाविक भक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.