तोतया अन्न व भेसळ निरीक्षका विरोधात गुन्हा

हॉटेल्स, पान टपऱ्यांची लूट करणारा तोतया

0

केज, रयतसाक्षी : अन्न व भेसळ निरीक्षक असल्याचा बहाणा करून टपरी व दुकानांची तपासणी करणाऱ्या तोतयागिरी करणाऱ्या दोघा विरूद्ध् केज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

दि. २७ फेब्रूवारी रोजी केज तालुक्यातील मस्साजोग येथील शिवनेरी पान स्टॉल आणि केज येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरातील हॉटेल्स व पान टपऱ्या या आम्ही अन्न व भेसळ विभागचे निरीक्षक आहेत. असे सांगून त्या तपासण्याचा बहाणा करणारे भामटे हे त्यांचे ओळखपत्र दाखवा असे म्हणताच पळून गेले होते. त्याची माहिती केज पोलीसांना मिळताच पोलीसांनी पाठलाग करून रमेश पांडुरग नागरगोजे वय २८ वष्र् व ज्ञाणेश्वर आत्माराम आंधळे वय २७ वर्ष् दोघे रा. हिंगणी ता. जि. बीड या दोघांना ताब्यात घेतले होते.

 

त्या दोघा तोतया अन्न व भेसळ प्रतिबंधक आधिकाऱ्यांवर पोलीस नाईक उमेश आघाव यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.