बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमावत यांच्या पथकाची कारवाई

0

बीड, रयतसाक्षी : आयकर चुकवून टोकन पद्ध्तीने पैशांची देवाणघेवाण करणरा हवाला रॅकेटचा सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने दि. २८ सोमवारी पर्दाफाश केला. शहरात तीन ठिकाणी धी टाकून तिघांना ताब्यात घेत सुमारे ५१ लाख रूपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत केली.

 

 बीड शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या हवाला रॅकेट सुरु असल्याची माहिती केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक रवाना केले. या पथकाने शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स व सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एका ठिकाणी छापा टाकला. सायंकाळी साते ते रात्री आठ दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
यात अनुक्रमे ३५ लाख ७९ हजार रुपये, ९ लाख रुपये, ६ लाख ४१ हजार रुपये अशी एकूण ५१ लाख २६ हजार रुपयांची बेकायदेशीर रोकड आढळून आली.याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांना हिशेब देता आला नाही.

 

यावेळी तिन्ही ठिकाणच्या व्यवस्थापकांना तब्यात घेतले. मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडूरंग घाडगे अशी त्यांची नावे आहेत. शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक बाळराजे दराडे, हावलदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, दिलीप गित्ते, राजू वंजारे, पो. ना. विष्णू चव्हाण, रवी आघाव, संजय टुले, दिपक जावळे, अविनाश सानप यांचा या कारवाईत समावेश होता.

दरम्यान, पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडलेल्या तिन्ही संशयितांकडे कसून चौकशी सुरू आहे. हवाला रॅकेट कसे चालायचे, किती रूपयांचा व्यवहार व्हायचा, कमिशन किती मिळायचे या बाबी चौकशीत निष्पन्न होतील. पोलीस आयकर विभागाला पत्र देणार असून ते पुढील कार्यवाही करणार आहेत.  

 

पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाईल जप्त

कारावाई दरम्यान पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हवाला रॅकेटचे इतर ठिकाणचे कनेक्श्न देखील या कारवाईमुळे समोर येण्याची शक्यता आहे. थेट कार्यालये थाटून हवाला रॅकेट सुरू असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.