शिवालये गजबजली: शिरूरच्या धाकट्या अलंकापुरीत शिवभक्तांची मांदीआळी

मध्यरात्री पासूनच दर्शनासाठी शिवभक्तांनी रांगा लावल्या होत्या दिवसभर श्रीफळ, बेल वाहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

0
  • शिरूर कासार, रयतसाक्षी : शिवरात्रीच्या महापर्वा निमित्त मंगळवारी दि.१ राज्यभरातील शिवालय शिवभक्तांनी गजबजली. पहाटेपासूनच शिवमंदीरात भाविकांनी अभिष, आरती, शिवलीलामृत पठण, श्रवण करून भोलेनाथांना साकडे घातले  बारा ज्योतिर्लींगा पैकी परळी वैजिनाथ मंदीरात मध्यरात्रीपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या.

 

बीड शहरातील कंकालेश्वर मंदीरात बीडकरांनी पहाटेपासून रांगा लावून भोलेनाथास साकडे घातले. शिरूर कासार येथील श्री सिदधश्वर संस्थान धाकटी अलंकापुरी येथे  शिवसाप्ताहा निमित्त संस्थानवर भाविकांची मांदीआळी होती. मध्यरात्री पासूनच दर्शनासाठी शिवभक्तांनी रांगा लावल्या होत्या दिवसभर श्रीफळ, बेल वाहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

शिवरात्री महापर्वाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी शिरूर कासार येथील श्री. सिद्धेश्वर संस्थान, धाकटी आलंकापुरी शिवालयामध्ये शिवभक्तांनी पहाटेपासून रांगेत दर्शनाचा लाभ घेतला. शिवसाप्तहा निमित्त  आठवडाभरापासून भाविकांच्या गर्दीने सिद्धेश्वर शिवालय गजबजलेले आहे. वै.ह.भ. प. आबादेव महाराज यांनी प्रारंभ केलेला शिवरात्रीपर्वाचा शिवसाप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

हे ही वाचा  शिवरायांचे रामदास कधीच गुरू नव्हते, हाच खरा इतिहास https://rayatsakshi.com/1742/

मठाधिपती विवेकानंद शस्त्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली साप्ताहामध्ये ख्यातनाम प्रवचनकार, प्रबोधनकार, किर्तनकारांनी सेवा बजावली. भाविकांसाठी दरवर्षी परवणी ठरणारा शिवसाप्ताह कारोना संकटामुळे यावर्षी दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर संस्थान, धाकट्या अलंकापुरीचा शिवसाप्ताह भाविकांसाठी पर्वणी ठरत असल्याने कोरोनाच्या संकटानंतर यंदा धाकट्या अलंकापुरीत भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे.

 

आठवडाभरापासून रांगा लावून दर्शनाचा लाभ घेत आहेत. शिवरात्रीच्या महापर्वा निमित्त मंगळवारी श्री सिद्धेश्वर शिवालयामध्ये भाविकांनी पहाटेपासूनच अभिषेक, आरातीसाठी गर्दी केली. दिवसभर महिला, पुरूष भाविकांनी शिस्तबद्ध पध्दतीने दर्शनाचा लाभ घेतला. बुधवारी दि. २ शिवसाप्ताहाची सांगता होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.