राजकिय आरक्षण गेल्यानंतर, ओबीसींचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणही जाण्याची शक्यता- ऍड. प्रकाश आंबेडकर

इतर कुणाशीही युती पण, भाजप आणि एमआयएमसाठी दरवाजे बंद

0

नांदेड,रयतसाक्षी:  ओबीसी आरक्षणसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात राजकिय आरक्षणसंदर्भात योग्य अहवाल दाख्ल न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालने ओबीसींचे राजकिय आरक्षण् सध्यातरी नाकारले आहे. भिवष्यात ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरीतील आराक्षण जाण्याची शक्यता भिती व्यक्त करत युक्रेनमध्ये आडकलेल्या भरतीयांना मायदेशात आणण्यास सरकार अपयशी ठरत असल्याच आरोप वंचित बहूजन आघाडीचे राष्र्टीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला

वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर हे दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत गुरूवारी दि.३ दुपारी येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, प्रदेश प्रवक्ते फारूख् अहमद, प्रा. गोविंद दळवे, प्रा. नामदेव पांचाळ, जिल्हाध्यक्ष दक्षीण शिवा नरंगले, श्याम कांबळे यांची उपस्थिती होती.

ऍड. आंबेडकर म्हणाले की, ओबीसींच्या राजकिय आरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने आरक्षण देण्यात यावे याचा सवितस्तर अहवाल दिला नाही. न्यायालयाने या समाजाला राजकिय आरक्षण देण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न विचारला , त्याचे न्यायालयाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाने ओबीसींचे राजकिय आरक्षण नाकारले आहे.

 

आता भविष्यात ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणही जाऊ शकते अशी शक्यता अड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. जर हे आरक्षण तुम्हाला टिकवायचे असेल तर भाजप, काँग्रेस राष्र्टवादी काँग्रेस आणि शिवसेना या चारही पक्षाच्या उमेदवारांना जागा दाखविण्याचे काम करावे लागेल, असे अवाहन ओबीसी समाजाजील बांधवांना त्यांनी केले.

 

हे सरकार नाठाळपणाने काम करत आहे. मराठा समाजाचे आरक्षण श्रीमंत मराठ्यांनी घालवल्याचा आरोपही त्यांनी केला. बीजेपी आणि आरएसएस यांचे तर मुळातच आरक्षण् या तत्वालाच विरोध असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू योग्य रीतीने मांडली नसल्याचा आरोप त्यांनी केला. एम्पॅरिकल डेटा तयार करण्यासाठी काही अवघड नाही, तशी परिस्थिती सुद्धा नाही, परंतु सरकारला ओबीसीला राजकिय आरक्षणापासून वंचित ठेवायचे आहे असा आरोप त्यांनी केला.

 

सत्तेती ओबीसींचे नेत हे सत्ताधारी प्रस्थापितांचे सालगडी असल्याचा घनाघात करत येत्या जिल्हा  पपरिषद, पंचायत समिती, नगरपालिला, महानगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण्कीमध्ये भाजप सोडून कुठल्याही पक्षाशी वंचित बहूजन आघाडी युती करू शकते. जर युतीसाठी कोणी हात समोर केला तर त्यांच्यासोबत अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ठ  केले.

 

केंद्र सरकार युक्रेनमध्ये आडकलेल्या भरतीयांना सुखरूप मायदेशी आण्ण्यासाठी सपसेल अपयशी ठरले आहे. येथील गुप्तचर यंत्रणही कुचकामी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बीजेपी आणि एमआयएमसाठी आमचे नेहमी दरवाजे बंद असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी मंत्री सध्या जेलमध्ये जात आहेत. ही बाब राज्यासाठी चांगली नसून ज्या मंत्र्यावर आरोप होत आहेत ते तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत त्यांनी स्वत:हून राजीनामे द्यावे आणि आपल्याकडचे निर्दोष असल्याचे पुरावे सादर करावे.

न्यायालयाकडून आपण निर्दोष असल्याचे सांगावे. भविष्यात ओबीसी समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी पुन्हा एकदा इंम्पॅरिकल डेटा तयार करून उच्च व सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. जेणेकरून पावसाळी अधिवेशनात कायदा करून त्यावर सरकारला आपली बाजू मांडता येईल आणि पुन्हा ओबीसी राजकिय आरक्षण मिळू शकते. तसेच केंद्र व राज्य सरकारने मागासवर्गीय अयोगाला एक रूपयांचाही निधी दिला नसून ५०० कोटी रूपये दिल्याची वल्गना सरकार करत आहे. हे सरकार फसवे असून ओदर मराठ्यांची आणि आता ओबीसींची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याच आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.