धक्कादायक: जमीनीच्या वादातून महिलेच्या खूनाचा तिन महिण्यानंतर उलगडा

महिलेचे प्रेत तिच्याच शेतात पुरले, तिन आरोपी अटकेत

0

आष्टी रयतसाक्षी : जमीनी आमच्या नावावर करून दे, असे म्हणत एका ४२ वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह तिच्याच शेतात पुरल्याचे तब्बल तीन महिण्यानंतर बुधवारी दि. दोन उघडकीस आले. मंदा हरिभाऊ गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मंदा हरिभाऊ गायकवाड या बीड-कडा नगर राष्र्टीय महार्गावर वटणवाडी येथील आहेत. सोळा वर्षापूर्वी त्यांचा पती बेपत्ता झाला. त्यांना मुलबाळ नसून केवळ अंध सासू आहेत. हतबल असल्याची संधी साधत भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगर्डे हे तिघे मंदा यांना जमीन आमच्या नावावर करून दे अन्यथा जीवे मारू, असे म्हणत दबाव आणत . मात्र मंदा यांनी त्यास सपशेल नकार दिला. यानंतर ३ नोव्हेबर २०२१ रोजी शेतात गेलेल्या मंदा या परतल्याच नव्हत्या.

 

यामुळे त्यांच्यसा भावाने पोलिसात संशयितांची नावे देऊन फिर्याद दिली. दरम्यान बुधवारी दि. २ मंदा यांच्या शेतात कुत्र्यांनी जमीनीत पुरलेले एक प्रेत बाहेर काढले होते. हे काही शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शेतात धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवत हा मृतदेह मंदा गायकवाड यांचा असल्याचे स्पष्ठ झाले. मंदा यांच्या भावाच्या फिर्यादीवरून भरत गायकवाड, प्रल्हद घुमरे, सुनिल गांगर्डे यांच्या विरूद्ध् खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आष्टी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बुधवारी रात्री मोठ्या शिताफीने अटक केली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी पहाणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.