ॲड.कर्मवीर एकनाथ आव्हाड यांचे सानिध्य लाभलेल्या पारधी समाजास उपवाशी ठेवणार नाही — दत्ता कांबळे

आंदोलनकर्त्यांनी दिला आठवणींना उजाळा, सामाजीक कार्यकर्ते, पदाधिकारी भाऊक

0

माजलगाव, रयतसाक्षी: मौजे शहापूर येथील पारधी समाजातील अतिक्रमित गायरान धारक तारिक दोन मार्च रोजी सकाळपासून उपवाशी पोटी आपल्या हक्क आणि अधिकारासाठी आपल्या मुलाबाळांसह अतिक्रमित गायारान जमीन नावे करण्याच्या संदर्भाने लाक्षणिक आंदोलन करत आहेत. रात्री काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे व सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधला असता, कर्मवीर ॲड एकनाथ आव्हाड यांच्या मानवी हक्क अभियान या राज्यव्यापी संघटनेनं केलेलं कार्य व कर्मवीर ॲड एकनाथ आव्हाड यांच्या आठवणींना उजाळा आंदोलनकर्त्यांनी दिला .

यावेळी आंदोलनकर्ते हे सकाळ पासून रात्री दहा वाजेपर्यंत उपावशी पोटी आंदोलन करत होते ,तेव्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष यांनी ,कर्मवीर ॲड एकनाथ आव्हाड यांच्या सोबत चळवळीत सहभागी व आपले योगदान दिलेल्या लोकांना कदापिही उपवाशीपोटी झोपू देणार नाही म्हणत , आंदोलनकर्त्यांच्या अल्पोहराची व्यवस्था करून या न्याय मागण्यांसाठी काँग्रेसच्या माध्यमातून प्रशासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी आपण सोबत राहू असे अश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले .यावेळी सामजिक कार्यकर्ते संजय वाघमारे सह आंदोलनकर्ते उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.