बीडच्या क्रिडा संकुलाच्या फलकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हटविले

शिवप्रेमींतून संताप, फलक पूर्ववत करण्याची मागणी

0

बीड, रयतसाक्षी:  श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियमचे नाव काढल्याचे शुक्रवारी दि. ४ उघडकीस आले आहे. दरम्यान त्याजागी केवळ जिल्हा क्रिडा संकुल अशा नावाचे बोर्ड झळकल्याने शिवप्रेमीत संताप व्यक्त केला जात आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोणी काढले, जिल्हा स्टेडियमचे नामांतर केले आहे का? असे एक ना अनेक प्रश्न तमाम शिवप्रेमींतून उपस्थित होत आहेत. स्टेडियमला देण्यात आलेले महाराजांचे नाव शासकिय दप्तरी नोंदवले गेले नाही का? नोंदवले असेल तर ते नाव का काढण्यात आले? नोंदवले नसेल तर आजपर्यंत शासन- प्रशासन व्यवस्था काय करत होती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .

 

बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भव्य जिल्हा क्रिडा संकुल आहे. या क्रिडा संकुलस गेल्या वीस वर्षापूर्वी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल असे नाव देण्यात आले होते. तसे फलक क्रिडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. कित्येक वर्षापसून शासकीय , निमशासकीय आणि खासगी कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचं स्थळ श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल असे स्पष्टपणे लिहिले जात होते. गेल्या आठ दिवसांपर्यंत या क्रिडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वार आणि आतील बोर्डावर महाराजांचे नाव उठून दिसत होते. मात्र, शुक्रवारी जिल्हा क्रिडा संकुलाच्या प्रवेशद्वारासह आतील वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवामी महाराजांचं नाव वगळण्यात आले आहे.

 

त्या जागी केवळ जिल्हा क्रिडा संकुल एवढेच नाव दिसून येत आहे. तर मुख्य प्रवेशद्वारावरचेही महाराजांचे नाव काढून त्या ठिकाणी जिल्हा क्रिडा संकुल बीड अशा नावाचा बोर्ड डकविण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोणी व काढले ? हा सवाल विचारत असंख्य शिवप्रेमी संतापून गेले असून प्राप्त माहितीनुसार शासकिय ठिकाणी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल असे नाव नसून त्या ठिकाणी केवळ जिल्हा क्रिडा संकुल असे नाव आहे.

 

त्यामुळे शुक्रवारी दि. ४ क्रिडा संकुलावर असे बोर्ड लावण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालखंडात श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव लावून आज अचानक ते नाव काढले गेल्याने या मागचा नेमका उद्देश काय हा प्रश्न उपस्थित होत असून क्रिडा संकुलास पुर्ववत छत्रपतींचे नाव देण्याची मागणी तमाम शिवप्रेमींतून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.