माजी आमदार साहेबराव थोरवे यांचे निधन

आष्टी तालुक्यावर शोककळा

0

आष्टी, रयतसाक्षी : आष्टी तालुक्याचे भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले माजी आमदार साहेबराव पंढरीनाथ थोरवे यांची शुक्रवारी पहाटे २:०० च्या दरम्यान वृद्धपकाळाने प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय ११७ वर्षे होते. त्यांच्या जाण्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

 

सामाजीक , राजकिय, शैक्षणिक, धार्मीक क्षेत्रात व स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान असलेले, ज्येष्ठ स्वातंत्र्य  सेनानी, लोकमान्य शिक्षण् संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी, आष्टी तालुक्याचे भिष्माचार्य म्हणून त्यांना ओळखल जायच.  सलग १५ वर्षे आष्टी पंचायत समितीचे सभापती म्हणून ज्यांनी पद भूषवले, कडा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मराठावाडा मुक्तीसंग्राममध्ये जीवाची बाजी लावून मोघली सत्तेच्या विरोधात मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी राहिले.

 

असे साहेबराव पंढरीनाथ् थोरवे दादा यांची शुक्रवारी वयाच्या ११७ व्या वर्षी राहत्या घरी प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. आयुष्यभर धार्मीक, राजकिय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये वाहून घेतलेले धुरंधर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. हनुमंत साहेबरराव थोरवे यांचे ते वडील तर धैर्यशील हनुमंतराव थोरवे यांचे ते आजोबा होत. थोरवे कुटूंबींयाच्या दु:खात दै. रयतसाक्षी परिवार सहभागी आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले दु:ख व्यक्त

आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक, राजकिय व शिक्षण क्षेत्रात आगळा वेगळा नावलौकिक स्थापित केलेले ज्येष्ठ नेत साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असून, त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या समाजकारणातील एक ऊर्जास्त्रोत निवर्तल्याची खंत व्यक्त करत   पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.