इंजि कोंडीराम निंबाळकर मराठा समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

पुरस्कर्ते कोंडीराम निंबाळकर बीड जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत

0

शिरूर कासार, रयतसाक्षी :  तालुक्यातील पौडूळ येथील कार्यकारी अभियंता शिवश्री कोंडीराम निंबाळकर हे बीड जिल्हा जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहेत. त्यांना मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा जिजाऊ रत्न मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत  पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी त्यांना  सन्मानीत करण्यात  आले.

मराठा सेवा संघा च्या वतिने समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दरर्षी प्रमाणे याही वर्षी मराठा सेवा संघाचे जिजाऊ रत्न पुरस्कार घोषीत करण्यात आले होते. मराठा सेवा संघाच्या निवड समितीने तालुक्यातील पौंडूळचे भुमिपुत्र व बीड जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत कोंडीराम निंबाळकर यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना जिजाऊ रत्न पुरस्कार जाहिर केला होता.

 

शुक्रवारी दि. ४ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे मराठा सेवा संघाचे धनंजय शेंडगे संभाजी ब्रिगेडचे महेंद्र मोरे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष कमलताई निंबाळकर कार्यकारी अभियंता पोपटराव जोगदंड आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हास्ते कार्यकारी अभियंता कोंडीराम निंबाळकर यांना जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यकारी अभियंता श्री. निंबाळकर यांचे सर्व स्तारातून अभिनंदन केले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.