सर्परातील वन्यजीवांच्या सहवासात रमले पद्मश्री डॉ प्रकाश आमटे

"सर्पराज्ञीत घरी आल्यासारख वाटतंय". - पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : वन्यजीव दिनाच्या दुसऱ्या दिवशी थोर समाजसेवक आदरणीय पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे यांची अचानक सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात भेट देऊन तेथील जखमी ,आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांची पाहणी करत,”सर्पराज्ञीत आल्यानं घरी आल्यासारखं वाटतंय ” असे गौरवोद्गार काढले.


गेल्या दोन तपासून जखमी, आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्य जीवांची सेवा सुश्रुषा करणारे सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे ,दांपत्य चालवत असलेल्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रास काल थोर समाजसेवक आदरणीय पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे यांनी भेट दिली. येथील जखमी ,आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांची मोठ्या आपुलकीने पाहणी करून, प्राण्यांवर प्रेमाने हात फिरवत सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे करत असलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

तसेच येथील गंगाई नक्षत्र वन, रामवन घनवान व नंदनवन दुर्मिळ अति दुर्मिळ वनस्पती जतन केंद्राची मोठ्या उत्साहात सिद्धार्थ सृष्टी सोनवणे यांच्या सोबत स्वतः पद्मश्री डॉ.प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे पायी फिरून पाहणी केली.

यावेळी सर्पराज्ञीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पद्मश्री डॉ प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे यांच्या हस्ते दुर्मिळ अशा बोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत नितीनजी पवार आणि मंजिरीताई परांजपे होते.

 

यावेळी पुणे येथून आलेले आर्किटेक जोशी, निसर्गमित्र नरेंद्र पितळी काका, प्रक्रियाचे सचिन नलावडे मुग्धा ताई नलावडे उपस्थित होते.

प्रत्यक्षात देव भेटल्याचे समाधान

”आदरणीय थोर समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व मंदाताई आमटे यांनी सर्पराज्ञीस दिलेली अचानक भेट ही आमच्यासाठी आमच्या वन्यजीवांच्या सेवा सुश्रुषाच्या दोन तपांच्या तपश्चर्येची साक्षात परमेश्वराने दिलेली भेट होय .ही भेट अविस्मरणीय व आनंददायी होय ”
सिद्धार्थ ,सृष्टी सोनवणे
(संचालक:सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.