स्वत:तील क्षमता, सामर्थ्य जाणावे – प्रा.नितीन बानगुडे

मुक्ताई फाऊंडेशन व जगदंब मित्र मंडळ देवखेडा संयुक्त शिवजयंती महोत्सव

0

माजलगाव, रयतसाक्षी : अडचणी तुम्हाला थांबविण्यासाठी नाहीत, तर तुमची उंची वाढविण्यासाठी येतात. संकटे रोखण्यासाठी नाहीत, तर क्षमता वाढविण्यासाठी येत   असल्याचे प्रतीपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. मुक्ताई फाऊंडेशन व जगदंब मित्र मंडळ देवखेडा च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सवाच्या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.

 

शिवजयंती उत्सवा निमीत्त शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवनचरित्राचा संदर्भ घेऊन उपस्थितांना मार्गर्शन केले. प्रसंगी ते म्हणाले की, अडथळे अडचणी निर्माण करण्यासाठी नव्हे तर तुमच्यात कौशल्य निर्माण करण्यासाठी येतात. धोका नको म्हणून जे काहीच करत नाहीत, ते काहीच बनत नाहीत. जे काहीतरी करतात तेच काहीतरी बनतात. संधी शोधावीच लागते, ती निर्माण करावी लागते. व्यापक विचार ठेवा, यशही व्यापक मिळेल. या सृष्टीत तुमचा पराभव दुसरा कोणीच करु शकत नाही. तुमचा पराभव तुम्हीच करु शकता. तुम्हाला कोणीच विजयी करु शकत नाही, केवळ तुम्हीच तुम्हाला विजयी करु शकता.

स्वराज्यातील रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी व्यापक योजना आखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे थोर कल्याणकारी राजे होते,भान राखून योजना आखायच्या आणि बेभान  होऊन त्या पूर्णत्वास न्यायच्या असे महाराजांचे वैशिष्ट्य होते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

 

पुढे बोलताना ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी प्रत्येक घटनेचे नियोजन केले होते. समुद्रातील भक्कम किल्ले त्यांच्या स्थापत्य विषयक बुद्धिमत्तेचाआजही परिचय करून देतात. अल्पावधीत शेकडो मजबूत किल्यांची निर्मिती केली. शिवरायांचे गड अत्यंत मजबूत , संरक्षण सिद्ध आणि धान्याची कोठार, पाण्याची सोय आणि बाजारपेठांनी सुसज्ज असायचे,या किल्ल्यांचा अभ्यास आजही देशविदेशातील स्थापत्य तज्ञ करतात असे सांगून  छत्रपती शिवाजी महाराजांकडे मोहिमा असो की लढाई ती जिंकायचीच असा प्रगढ आत्मविश्वास होता असेही बानगुडे पाटील म्हणाले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांनी मुक्ताई अर्बन व फाऊंडेशन यांचे कौतुक केले तर उद्घाटक भाजपा नेते रमेशराव आडसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित मा.आ. राधाकृष्ण होके पाटील, चंद्रकांतजी शेजुळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, बबन बप्पा साळुंके, अरुण आबा राऊत आदांसह शिवप्रेमी मोठे संख्येने उपस्थित होते तर नागरिकांनीही गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.