ऐतिहासीक वेशीतून सांडपाण्याचा प्रवाह !

व्यवसायिक नागरीक मेटाकुटीला, स्थानिक प्रशासनाचे दूर्लक्ष

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : स्थानिक प्रशासनाच्या दूर्लक्षामुळे शिरूर शहरातील गल्लीबोळात, मुख्यरस्त्यावरून सांडपाण्याचा प्रवाह होत आहे. ऐतिहासिक वास्तुंचे जतन करताना त्याचे पावित्र्य राखण्यासाठी निधी खर्च केला जात असला तरी शहरातील ऐतिहासिक वेशीतून शहरातील बांधकामाचे सांडपाणी प्रवाहीत होत असल्याने व्यवसायिक, नागरिक मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाकडे व्यवसायिकांनी वारंवार मागणी करूनही दूर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील व्यवसायिकांनी केला आहे.

शिरूर कासार शहराच्या गल्ली बोळातील रस्ते सी.सी. निर्मीतीचे आहेत. मागील कित्तेक वर्षापासून टप्या- टप्याने निधी खर्च करून शहरांतर्गत रस्ते विविध योजनांतून मजबुतीकरण, भुमिगत गटारांची निर्मीती करण्यात आली. दरम्यान रस्ते निर्माणानंतर शहरवासीयांनी सोइनुसार नळ कनेक्श्न, निवास उपयुक्त पाइपलाईन आदी कामांसाठी सीसीसी रस्त्यांची चाळणी केली. त्यामुळे निमुळत्या भुमिगत गटारांची दूरावस्था झाली.

नगरपंचायत अस्तीत्वा नंतर पहिल्या टप्यात झालेल्या विकास कामांचे अवघ्या पाच वर्षात अस्तीत्व दिसेनासे झाले.शासनस्तरावरून शहरविकास कामांना गती देण्यात आल्याने शहराच्या गल्ली बोळातील अंतर्गत रस्त्यांचे सीसीसी पद्धतीने निर्माण करण्यात आले. नियोजीत विकास कामे राबविताना शहराचा ऐतिहासिक वारसा कायम राखण्याच्या उद्देशाने गांधी चौकातील ऐतिहासिक वेशीचे अस्तीत्व कायम राखण्यात आले आहे. दरम्यान, पुरातन काळातील वेशिच्या दगडी पायऱ्यांनाही काँक्रेटीकरणाने त्याची मजबुती वाढविण्यात आली.

पण हानुमान गल्ली, मुख्य पेठ रस्त्यावरील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुमिगत गटारांचा तळामेळ जुळवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने रस्त्यावरील सांडपाणी चक्क ऐतिहासिक वेशीतूनच प्रवाहीत होत असल्याने नागरिकांना शहरात प्रवेश करतानाच सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. वेशीतून प्रवाहीत होणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापनासाठी व्यवसायिकांनी नगरपंचायत कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला परंतू प्रशासनाने व्यवसायिक नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या समस्येकडे जानिवपूर्वक दूर्लक्ष केल्याचा आरोप व्यवसायिक नागरिकांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.