शिरूरकासार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत

साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रच नाही, प्रशासनाने तात्काळ मार्ग काढवा भजपाची मागणी

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : शिरूर कासार तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या सिंदफणा नदीकाठच्या गावांसह पलघू व मध्यप्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. दरम्यान मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले असले तरी आता कार्यक्षेत्रा अभावी तालुक्यातील ऊस कारखाने तोडइ, वाहतूकीस धजावत नाहीत. त्यामुळे उसाचे उभे पिक शेतातच वाळत आहे. प्रशासनाने वेळीच ठोस उपाय योजना राबवण्याची मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर यांनी केली आहे.

 

यंदा मुबलक पाणीसाठ्यामुळे तालुक्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तालुक्यातून प्रवाहित होणाऱ्या सिंदफणा नदी काठच्या शेत शिवारासह उथळा, सिंदफणा मध्यमप्रकल्पांच्या ओलीताखाली येणाऱ्या क्षेत्रात निम्यावर तर साठवण, पाझर तालावांच्या  क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. हिरवा पट्टा समजल्या जाणाऱ्या पिंपळनेर, गोमवळवाडा, कोळवाडी, पाडळी, तागडगांव, निमगाव मायंबा, फूलसांगवी, हाजीपूर, गाजीपूर, कमळेश्वर धानोरा, शिरापूर गात, शिरापूर धुमाळ, आर्वी, तरडगव्हाण भोसले, ब्रम्हणाथ् येळंब, नांदेवली, राळेसांगवी, माळेवाडी, वडाळी, मोरजळवाडी, घाटशिळ पारगाव, चाहूरवाडी, सवसवाडी, जाटनांदूर, खोपटी, तिंतरवणी, आनंदवाडी, रायमोहा, खोकरमोहा आदी गावशिवारात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे.

 

गेल्या दहा वर्षापासून तालुक्यास साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र नसल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादन साखर कारखान्यास देताना परवड होत आहे. यंदा मुबलक पाणीसाठ्यामुळे तालुक्यातील बागायतदार शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी बनला खरा पण हक्काच्या साखर कारखान्या अभावी केवळ तोडइ, वाहतूकी अभावी ऊसाचे पिक शेतातच वाळून चालले आहे.

 

इतर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या मनमानी धोरास मेटाकूटीला येऊन कित्तेक शेतकरी शशेतातील उभे ऊसाचे पिक पेटवून देण्याच्या मनस्थितीत आहेत. दरम्यान, साखर कारन्या अभावी अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात ऊसाचे एक टिपरूही शिल्लक राहणार नाही याची वेळीच प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर यांनी केली आहे.

 

आथीर्क भुर्दंड सोसूनही  ऊस जाइना : उत्पादनाच्या टप्यातील शेतात उभा ऊस वेळीच कारखान्यावर घालण्यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यां पासून ऊस तोड करणाऱ्या मुकादमांचा पाहूनचार करत आहेत. दरम्यान, मुकादमापासून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालका पर्यंत खिरापती वाटूनही वेळेत ऊस जाईल याची शाश्वती नसल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यातून बोलले जात आहे.

 

अन्यथा तिव्र आंदोलन: तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड थंबवून वेळेत साखर कारखान्यांनी ऊस उचण्याच्या उपाय योजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात प्रशासनाने याची आंमलबजावणी करावी अन्यथा भाजपाच्या वतिने तालुकाभर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल

डॉ. मधुसूदन खेडकर

शिरूर कासार तालुकाध्यक्ष भाजपा

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.