कोळवाडी येथून विवाहिता बेपत्ता

सकाळी प्रात:विधीसाठी बाहेर पडली विवाहिता घरी परलीच नाही

0

 

शिरूर कासार, रयतसाक्षी : सकाळी प्रात: विधीसाठी घराबाहेर पडलेली २६ वर्षीय विवाहिता घरी परलीच नसल्याची घटना शनिवारी (दि.१२) तालुक्यातील कोळवाडी येथे घडली.

तालुक्यातील कोळवाडी येथील एक २६ वर्षीय विवाहिता शनिवारी दि. १२ सकाळी प्रात: विधीसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. दरम्यान, घराबाहेर पडलेली विवाहिता दुपापर्यंत घरी परतली नसल्याने तिच्या पतीसह सासरच्या मंडळींनी आसपाच्या परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

 

गेल्या चार दिवसापासून नातेवाईक, मैत्रीनिंकडे शोध घेतला असता ती कोठेही मिळून येत नसल्याने बुधवारी (दि.१६) बेपत्ता विवाहितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलिसात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरिक्षक श्री. माने यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता विवाहितेचा पोलिस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.