शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लांबणीवर

सॉप्टवेअर टेंडरचे काम लवकरच पूर्ण्, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

0

मुंबई, रयतसाक्षी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या होऊ घातलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. तांत्रिक आडचणी अभावी एप्रील २०२२ महिण्यात होऊ घातलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया मे महिण्यात होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दि. १६ येथे दिली.

 

जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शासनस्तरावरून जवळपास निश्चित करण्यात आली होती. सेवा जेष्टता, रोस्टर पद्धतीने एप्रील २०२२ महिण्यात होऊ घातलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता जानकारांनी व्यक्त केली होती.

 

त्यानुसार बुधवारी दि.१६ राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील तांत्रिक अडचन जाहिर केली. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी सॉप्टवेअर टेंडरचे काम अद्याप अपूर्ण् असून लवकरच हे काम पूर्ण् करण्यात येणार आहे. त्यानुसार किमान मे महिण्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.