पुल कम बंधाऱ्यासाठी बनावट तांत्रिक मान्यता !

पाटोद्याच्या तांत्रिक मान्यता प्रकरणी बीडच्या आमदारांची विधानसभेत लक्षवेधी

0

मुंबई, रयतसाक्षी: बीड जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायत हद्दीत मांजरा नदीवरील ब्रीज-कम बंधऱ्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभगाने कोणतीही तांत्रीक मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सबंधीत तांत्रिक मान्यता बनावट असल्याने या प्रकरणची नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून पंधरा दिवसात चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगीतले.

 

पाटोदा नपगरपंचायत अंतर्गत मांजरा नदीवरील ब्रीज कम बंधाऱ्याच्या कामा संदर्भातील बहूचर्चीत तांत्रिक मान्यता प्रकरणी विधानसभा सदस्य प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

त्यास उत्तर देताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगीतले की, पाटोदा नगरपंचायतीला नागरी सुविधांसाठी सहाय्य योजनेतून नगरविकास विभागाने तीन कोटी रूपयांचे अर्थसहाय्य दिले, त्यातून दोन कोटी ९३ लाख रूपयांचा ब्रीज कम बंधाऱ्याचे काम प्रस्तावित केले, आणि अधिकार नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिल्याने या विषयी शंका नर्माण झाली.

दरम्यान, तांत्रिक मान्यता संबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खुलासा प्राप्त झाला असून अशा प्रकारची कोणतीही तांत्रीक मान्यता त्यांनी दिलेली नसल्याचे खुलाशाद्वारे कळवले आहे. बनावट तांत्रिक मान्यता मिळविल्याचे या प्रकरणात निदर्शनास आले आहे.

 

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच नागरी सुविधांसाठी सहाय्य योजनेतून ब्रीज कम बंधारा काम करात येते की, नाही हे देखील तपासून घेतले जाणार आहे. आष्टी आणि पाटोदा या नगरपंचायतीच्या कामकाजात काही अनियमितता होत असल्याचे अढळून आल्यास जिल्हाआधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जाईल, असेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सभागृहात सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.