बांबुच्या जंगलात आढळले आई-वडील, मुलाचे मृतदेह

माय-लेकराला दगडाने ठेचले, वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत

0

नांदेड रयतसाक्षी: जिल्ह्यातील भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे टाकराळा परिसरातील बांबूच्या जंगलात सोमवारी सकाळी एकाच कुटुंबातील तीन जणांचे कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आले. आई सीमा शांतमन कावळे (४०), सुजित शांतमन कावळे (१७) यांचे हातपाय बांधून त्यांना दगडाने ठेचून मारण्यात आले. वडील शांतमन सोमाजी कावळे (४५) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबातील अभिजित शांतमन कावळे (१८) हा युवक बेपत्ता आहे.

ही घटना ५ ते ६ दिवसांपूर्वी घडली असावी असे सांगितले जात आहे. मुंबई येथे राहणारे कावळे कुटुंब हे मागील लाॅकडाऊननंतर नांदेड जिल्ह्यातील मौजे टेभी (ता. हिमायतनगर) या मूळ गावी आले होते. तेव्हापासून त्यांच्याकडील अल्प जमीन कसून व मिळेल ती मजुरीची कामे करून उदरनिर्वाह भागवला जात हाेता. अचानक मागील ८ ते १० दिवसांपूर्वी कावळे कुटुंबातील चौघे जण बेपत्ता झाले व त्यांचे मृतदेह मौजे टाकराळा परिसरातील बांबूच्या जंगलात आढळून आले.

घटनास्थळीच केले शवविच्छेदन
लागलीच श्वानपथक व ठसेतज्ज्ञास पाचारण करण्यात आले असून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.